काही लोक पैसे वाचवून श्रीमंत होण्यासाठी झटत असतात पण श्रीमंत होणे आणि आपली आर्थिक श्रीमंती टिकविणे यात मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा पॉलिसीचे मोठे योगदान असते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर कणकण साठवलेला पैसा एका मिनिटात हॉस्पिटल अकाउंटला जातो तेव्हा जीव तीळ तीळ तुटतो पण या सर्वांचा विचार करायला वेळ कोणाकडे आहे?
*
एवढे महत्त्व सांगूनही,
*मेडिक्लेम कशाला? बघू वेळ येईल तेव्हा...
हे उत्तर ऐकायला मिळालं की समजतं की अजूनही काही गोष्टी सांगायच्या राहील्या आहेत.
त्या समजून घ्या...
मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा पॉलिसी ही काळाची गरज आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि सध्याची जीवनशैली लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यात आरोग्याशी निगडित कुटुंबांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आरोग्याशी निगडित आणि इस्पितळातील उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च वाढत चाललेला आहे.
जेव्हा आपण घराबाहेर जात असतो तेव्हा प्रचंड वाहतुकीचा ताण असल्याने अपघाताचे धोके जास्त संभव असतात. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे श्वसन आणि फुफ्फुस यांच्या आजाराचे प्रमाणात वाढत आहे. बाहेरील खाद्य पदार्थ वेळी-अवेळी आणि सतत खाणे यामुळे पित्ताशय, जठर, आतडी यांचे आजार वाढत आहेत. रुग्णालयात कोणत्याही कारणाने भरती व्हावे लागले तर उपचारांवर खर्च आपल्या खिशाला परवडेल का? याचा सारासार विचार सर्वांनी करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत जर मेडिक्लेम पॉलिसी नसेल तर बचत केलेली रक्कम यासाठी खर्च होणे स्वाभाविक आहे आणि अशी उदाहरणे आपण पाहत असतो. यामुळे मेडिक्लेम पॉलिसी काढून स्वतः आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक रक्षण करणे आवश्यक आहे. जेव्हा चे तेव्हा पाहू,आहे की आरोग्य छान.. असे विचार करून आरोग्य विमा न काढणे म्हणजे मोठ्या आर्थिक संकटाचे ओझे वाहून घेण्यासारखे असते.*
आता तरी काही लक्षात आले असेल तर पुरेसा आरोग्य विमा नक्की काढा.
आम्ही आपल्या उद्दिष्ट आणि गरजांनुसार गुंतवणूक करण्यात मदत करू शकतो.
अधिक माहिती साठी संपर्क करा.
Needbase presentation
Caring Chitra
Swanand,🦚 Investa
9819667599